मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर   

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईतील नोकरदार वर्गाला दुपारच्या वेळेत जेवणाचा डबा पुरविणारे मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाज बांधवांसाठी ठाणे-भिवंडी मार्गावरील अंजूर गावात १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  विकसक आणि राज्य सरकारमार्फत  एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या तीन वर्षांत साकार होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहात मुंबईतील डबेवालांच्या घरांबाबत आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता या निमित्ताने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून ‘म्हाडा’ने यासाठी पुढाकार घेतला आहे. 

Related Articles